अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- राज्यावर कोरोनाचे संकट कायम असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे.

रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करतायत.जरा तपासून घ्या स्वत:ला अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना धारेवर धरले आहे. भाई जगताप यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला. केंद्र सरकार काही राजा नाही.
त्यांनी सर्वांना मदत करायला हवी. आपली नैतिकता त्यांनी गुजरातला बांधली. गुजरातला मदत केली मग इतर राज्यांना का नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 हजार कोटींचे पॅकेज द्यावे.
परंतु, त्यांचा महाराष्ट्रद्वेष पाहता ते काही देतील अशी अपेक्षा नाही,परंतु महाराष्ट्र सरकारने चांगली मदत करावी, असेही ते म्हणाले. मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?’
या घोषणेवरुन देशात कॉंग्रसने भाजप विरुद्ध जोरदार लढाई सुरु केली आहे. त्यात जगताप यांनी भाजपविरोधात आंदोलनाचा इशारा दिला. भाजपाला सत्याचा सामना करावाच लागेल. उत्तर मुंबईतून या आंदोलनाची सुरुवात होईल, असे जगताप यांनी जाहीर केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













