अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच अनेक मंत्र्यांनााही कोरोनाची लागण झाली आहे.
अशातच महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत माहिती दिली की, “माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.
मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.”
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|