राज्यात सध्या आरक्षणाची लढाई सुरु आहे. यामुळे राज्यात ठिकठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी विविध समाज बांधवांच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहे.
याचे पडसाद नगरमध्ये देखील उमटत असून नगर जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंदोलने होऊ लागली आहे.
विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 13 जुलैला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बसपाचे नगर जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी दिली.
अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचार्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे, ओबीसींच्या राजकीय आरक्षण कायम रहावे व महागाई कमी करण्यासाठी इंधन दरवाढ मागे घेण्यात यावी…
यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान 13 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणारे आंदोलन करोना नियमांचे पालन करुन केले जाणार आहे मुंबईत झालेल्या या बैठकीसाठी बसपाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजणे,
खासदार विरसिंग, प्रमोद रैना, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार, प्रदेश कार्यालयीन सचिव प्रा. अभिजीत मनवर आदइहसह पक्षाचे सर्व महासचिव, प्रदेश सचिव, जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती.