कारवाईचा ‘धूम’धडाका! श्रीरामपूरात तीन दिवसात 30 दुकानांना प्रशासनाने टाळे ठोकले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुकतेच प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. दुपारी 4 वाजेनंतर दुकाने उघडी ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.

त्यांतरही दुकाने उघडी असल्यास संबंधित दुकाने सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. या पार्श्वभुमीवर पोलीस व नगरपालिका प्रशासनाने तीन दिवसांपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

करोना काळात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलत दुकाने सुरू ठेवणार्‍या दुकानांविरोधात पोलीस व नगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत तीन दिवसांत 30 दुकाने सील केली.

तसेच बेलापुरातील पाच दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय सानप व नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दुपारी 4 वाजेनंतर उघडी असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत.

या पथकाने तीन दिवसांत 30 दुकानांना सील ठोकले आहे. या शिवाय शहरात विनामास्क फिरणार्‍या दुचाकीस्वार व नागरिकांवरही प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

तीन दिवसात अशा सुमारे 70 हून अधिक नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe