‘मराठा’समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच संवाद दौरा….!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज हे आठरापगड जमातीमधील मावळ्यांचे होते. तसेच राजर्षी शाहू महाराजांनी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व मराठा समाज असे मिळून ५० % आरक्षण दिले होते.

परंतू कालांतराने केंद्र सरकारने नेमलेल्या कही कमिट्यांच्या अहवालामुळे मराठा आरक्षण गेले.आरक्षण ही कायदेशीर प्रक्रिया आहे. आजही जवळपास ७० टक्के मराठा समाज गरीब आहे.

या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा; मात्र सद्या सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये चाललेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे समाजात गैरसमज होऊन अपप्रकार होऊ नयेत. यासाठी मी हा संवाद दौरा काढला आहे.

असे प्रतिपादन छत्रपती खासदार संभाजी राजे यांनी केले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाची सध्यस्थीती, सारथी या संस्थेची सध्यस्थीती,

तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या विविध योजना अशा विविध विषयांवर  प्रबोधन करण्यासाठी  छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, लोकनेते, खासदार छत्रपती संभाजी राजे हे जामखेड येथे आले होते.

शुक्रवार दि.२ रोजी दुपारी साडे बारा जता नगरपरिषद समोरील प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe