DICGC : प्रत्येकाचे कोणत्या ना कोणत्या बँकेत खाते असते. प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते, ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. परंतु आता तुम्हाला 5 लाख रुपयांचा लाभ मिळेल. कसे ते जाणून घ्या सविस्तर माहिती.
हे लक्षात घ्या की ही रक्कम तुम्हाला ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे देण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे DICGC ही रिझर्व्ह बँकेची पूर्ण मालकीची कंपनी असून DICGC देशातील बँकांचा विमा उतरवत असते. या अगोदर जर या कायद्यांतर्गत बँक बुडाली किंवा दिवाळखोरी झाली तर 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येत होती, परंतु सरकारने ती वाढवून 5 लाख रुपये इतकी केली आहे. तसेच ज्या विदेशी बँकांच्या भारतात शाखा आहेत त्याही त्याच्या कक्षेत येत आहेत.
किती दिवसात मिळू शकेल रक्कम?
बँक बुडाली किंवा बंद झाली तर, DICGC ग्राहकांच्या खात्याशी संबंधित सर्व माहिती 45 दिवसांच्या आत जमा करते. तपासणी करून पुढील 45 दिवसांत रक्कम ग्राहकाला देण्यात येते. या संपूर्ण प्रक्रियेला एकूण 90 दिवसांचा म्हणजे तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
कोणत्या प्रकारची खाती कार्यक्षेत्रात येतात?
हे लक्षात घ्या की सर्व प्रकारच्या व्यापारी बँका त्याच्या कक्षेत येतात. यात बचत, चालू, मुदत आणि आवर्ती ठेवी यासह सर्व प्रकारच्या खात्यांचा समावेश असून समजा तुमचे खाते सरकारी बँक किंवा मोठ्या खाजगी बँकेत असल्यास तुमच्या पैशांचा विमा काढण्यात येतो.
DICGC च्या वेबसाइटनुसार, ऑगस्ट 2022 नंतरच्या अपडेटमध्ये असे सांगितले जाते की ते देशातील एकूण 2,035 बँकांचा विमा उतरवतात आणि जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असल्यास की तुमच्या बँकेचा विमा उतरवला आहे की नाही, तर तुम्ही साइटवर जाऊन त्याबद्दल माहिती घेऊ शकता.
दोन बँकांमध्ये खाती
समजा जर तुमची दोन बँकांमध्ये खाती असल्यास आणि दोन्ही बँका बंद पडल्या तर अशा परिस्थितीत तुम्हाला दोन्ही बँकांकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांचा निधी मिळेल. परंतु जर तुमची एकाच बँकेत दोन खाती असल्यास तर अशा परिस्थितीत तुम्हाला केवळ ५ लाख रुपये मिळतील. तसेच बँकेत तुमची ठेव 10 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये, बँक बुडली तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये देते.