अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-६० वर्षांवरील व्यक्तींना १ मार्चपासून कोरोना लसीकरण देण्याबाबत नियोजन शासनाने केले.
मात्र त्यासाठी आवश्यक असणारी नोंदणीच त्रासदायक ठरत असून, ऑनलाइन नोंदणीतील अडथळ्यांमुळे पहिल्या दिवशी कोणालाही लसीकरण होऊ शकले नाही.
दुसरीकडे आरोग्य विभागालाही थेट लेखी सूचना नसल्याने त्यांचीही संभ्रमावस्था आहे. सरकारने जाहीर केल्या प्रमाणे करोना लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना,
तसेच ज्यांना विविध आजार आहेत अशा ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याची मोहीम १ मार्चपासून देशभर सुरू झाली. सरकारी आरोग्य केंद्रात मोफत, तर खासगी रुग्णालयांत २५० रुपयांना ही लस मिळणार आहे.
त्यासाठी नगरमध्ये ३२ खासगी आणि ४ रुग्णालयांची यादी शासनाने जाहीर केलेली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी खासगी व्यक्तींनी केंद्र सरकारने तयार केलेल्या अॅपमधून नोंदणी करण्याचा प्रयत्न केला.
यात अडचणी आल्या. या व्यक्तींची नोंदणी होत होती. मात्र, शासकीय यंत्रणेच्या प्रणालीत या व्यक्तींची केवळ नावेच दिसत होती.
अन्य माहिती दिसत नसल्याने या काल पहिल्या दिवशी खासगी व्यक्तींंची नोंदणी होवू शकली नसल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेत थेट आलेल्या ४५ ते ६० वर्षाच्या सामान्य व्यक्तींची शासकीय पोर्टलवरून नोंदणी करून त्यांना करोना लस देण्यात आली आहे.
यात ४५ ते ५० वर्षाच्या १५ तर ६० पेक्षा अधिक वय असणार्या २११ अशा २२६ सामान्यांनी काल करोनाची लस घेतली. या लसीकरणासाठी प्रथम कोविन अॅप,
आरोग्य सेतू अॅप किंवा कोविन संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. ही नोंदणी करतानाच मोठ्या अडचणी येत आहेत. अशा अनेकांच्या तक्रारी आहेत.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|