अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-महाराष्ट्र राज्यात कोरोनाची भयानक परिस्थिती असून सर्व औषधे ‘टॅक्स फ्री’ करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इ-मेल द्वारे देण्यात निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या रूपाने महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती आली आहे. महामारीचे प्रमाण वाढल्यामुळे सामाजिक जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मागील २०२० वर्षापासून लॉकडाऊन काळामुळे बहुतांश सर्वच सामान्य नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाले असून जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कुटुंबासह सर्वांना जगण्यासाठी प्रचंड आर्थिक अडचण निर्माण होत आहे.
त्यामुळे जगण्याचा गंभीर प्रश्न सामान्य माणसावर उद्भवला आहे. त्या कोव्हिड १९ अर्थात कोरोना महामारी मुळे वैद्यकीय उपचारावर रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्चाचा बोजा प्रत्येक व्यक्तीला सहन करावा लागत आहे.
अशा नाजूक परिस्थिती केंद्र व राज्य सरकारने राज्यात सर्व औषधे हे ‘टॅक्स फ्री’ करावीत व सर्व सामान्य माणसाला या संकटाच्या काळात दिलासा द्यावा मागणी करण्यात येत आहे.निवेदनावर राज गवांदे, ओम काळे, वर्षा चौधरी, कैलास वाकचौरे, अशोक आवारी,
सुशांत वाकचौरे, कैलास जाधव, विक्रांत शेळके, बाळासाहेब कोकाटे, अमोल मोरे, अक्षय अभाळे, सुभाष देशमुख, डॉ. सचिन दातीर, शंकर उगले, भाऊसाहेब हाडवळे, सौरभ देशमुख, दत्ता जाधव, ऋषीराज शेवाळे आदींनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|