अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- एकीकडे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तौत्के चक्रीवादळ दाणादाण उडवत आहे. त्यातच देशात दुसरीकडे कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचं वादळ देशावर अजूनही घोंगावत असल्याचं चित्र आहे.
या संकटांच्या काळात अजून एका संकटाचा सामना गुजरातच्या लोकांना करावा लागला आहे. गुजरातच्या अमेरली राजुला भागानजिक सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसलेत.
सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. अमेरली राजुला भागानजिक सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले.
३.८ रिश्टर स्केलचे हे धक्के असल्याचं समजतंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.
भूकंपशास्त्रातील राष्ट्रीय केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३.३३ मिनिटांनी गुजरातच्या राजकोटमध्ये हा भूकंप जाणवला. यामुळे, रात्रीच लोक भीतीनं आपल्या घराच्या बाहेर निघाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम