कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करून भिंगारला नगरपालिका स्थापन करा 

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करुन भिंगारला नगरपालिका स्थापन करावी. अशी मागणी अ.नगर कॅन्टोमेंट बोर्डचे माजी व्हाईस प्रिसिडेंट ॲड.आर.आर.पिल्ले यांनी केली आहे.

नगर कॅन्टोमेंट बोर्डच्या विद्यमान सदस्याचे अधिकार संपुष्टात येऊन बोर्डची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत बोर्ड अध्यक्ष आणि प्रशासन बोर्डचा कारभार पाहावा, असा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे बोर्ड पूर्ण बरखास्त झाले नाही,असे नमूद करुन ॲड.पिल्ले यांनी भिंगारसह देशातील सर्वच कॅन्टोमेंट बोर्ड पूर्ण बरखास्त करुन त्या-त्या ठिकाणी नगरपालिकेची स्थापना करावी,

अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि खासदार डॉ.सुजय विखे पा. यांच्यासह संबंधित कॅन्टोमेंट बोर्डाच्या लोकसभा मतदार संघातील खासदारांना निवेदनाव्दारे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालबाह्य कायदे रद्द करण्याचे धोरण राबविले असल्याने ब्रिटीशकालीन कॅन्टों. बोर्ड बरखास्त करुन त्याऐवजी नगर पालिका आस्तित्वात आणाव्यात. कॅन्टों.बोर्डाचा कायदा कालबाह्य झाला असून, तो रद्द करण्यात यावा, देशातील ६२ पैकी ५६ कॅन्टों. बोर्डच्या लोकनियुक्त सदस्यांची मुदत संपुष्टात आली तर ६ कॅन्टों. बोर्डचे कामकाज सुरु आहे. नजिकच्या काळात यासर्व ठिकाणी निवडणुका होणार आहेत.

संसदेत कॅन्टों. बोर्ड कायदा दुरुस्तीवर यंदा चर्चा आहे. त्या निर्णयानंतर या ठिकाणी निवडणुका घेणार की बोर्ड पूर्ण बरखास्तीचा निर्णय होणार याकडे सद्या सर्वांचे लक्ष आहे. संसदेच्या वरिष्ठ पातळीवर कॅन्टों.बोर्ड बरखास्तीचा विचार सुरु असल्याने ही संधी साधून संबंधित खासदारांनी बोर्ड बरखास्तींचा ठराव मांडवा. व पक्षविरहित सर्व खासदारांनी या ठरावाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.