अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-जैन कॉन्फरन्स दिल्ली चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदाचा वाढदिवसाच्या अवाढव्य खर्च टाळुन सामाजिक उपक्रमांचा जागर होणार असुन ३ मार्च रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर, रक्ततपासणी शिबीरासह जैन कॉन्फरन्स दिल्ली व कोठारी प्रतिष्ठान जामखेड च्या वतीने दिल्या जाणाऱ्या यंदाच्या उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार सोहळ्याचेही वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली शहरातील महावीर भवन या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमास बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्यासह जैन कॉन्फरन्सचे नंदकुमारजी भटेवारा, रमेशचंद्र बाफना, महंत राधाताई महाराज व अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे .
यावेळी सकाळी दहा वाजता सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबीर होणार आहे, त्याचप्रमाणे कोठारी ह संत ज्ञानेश्वर माऊली वृद्धश्रम अंतरवली ता. भुम येथील वृद्धांसाठी किराणा चे ही वाटप होणार आहे .
त्यानंतर यंदाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार असुन यंदाच्या उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्काराचे दिव्य मराठी चे पाटोदा तालुका प्रतिनिधी महेश बेदरे, दैनिक प्रभात अहमदनगर विभाग चे ओंकार दळवी,
समीर शेख ( दैनिक सार्वमत ) मिठुलाल नवलाखा ( दिव्य मराठी अहमदनगर विभाग ) व अनिल गायकवाड ( दैनिक लोकमत ) हे मानकरी ठरले आहेत, त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे,
या कार्यक्रमास ग्रामीण आरोग्य प्रकल्याचे संचालक रविदादा आरोळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तहसिलदार विशाल नाईकवाडे, जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड ,
संजय वाघ, मुख्यधिकारी मिनीनाथ दंडवते, जेष्ठ पत्रकार दिनेश लिंबेकर, डॉ. भारत दारकुंडे, पाटोदा पोलीस ठाण्याचे एपीआय महेश आंधळे,
अंमळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय शामकुमार डोंगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहीती निमंत्रक जामखेड चे माजी सरपंच सुनील कोठारी व कोठारी प्रतिष्ठान जामखेड चे राहुल राकेचा यांनी दिली आहे
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|