कोरोनाचे संक्रमण वाढत असताना पोलीस प्रशासनास एन 95 मास्कचे वाटप

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- कोरोना महामारीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या पोलीस प्रशासनास शेवगाव, पाथर्डीचे नेते अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांच्या वतीने एन 95 मास्कचे वाटप करण्यात आले.

काकडे यांच्या वतीने तुकाराम विघ्ने यांनी एन 95 मास्क स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पो.नि. अनिल कटके, कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.नि. राकेश मानगावकर, नगर तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. राजेंद्र सानप यांच्याकडे सुपुर्द केले.

यावेळी सहा.पो.नि. मिथून घुगे, सोमनाथ दिवटे, जारवाल, पो.ना. सोमनाथ दिवटे, संदीप घोडके, संदीप पवार, शंकर चौधरी, कमलेश पाथरुड, विनोद मासाळकर, पो.हे.कॉ. नाणेकर, प्रमोद लहारे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यासह शहरात कोरोनाचे संक्रमण दिवसंदिवस वाढत आहे. पोलीस कर्मचारी हॉटस्पॉट भागासह शहरात विविध ठिकाणी सेवा देत आहेत.

कोरोनाच्या संकट काळात जीवाची बाजी लावून पोलीस कर्मचारींनी कोरोनाची पहिली लाट थोपावून लावली. तर दुसर्‍या लाटेत देखील ते महत्त्वाची जबाबदारी पेळवत आहे.

सामाजिक भावनेने त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना मास्कचे वितरण करण्यात आले असल्याची भावना अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांनी व्यक्त केली.

तुकाराम विघ्ने यांनी शेवगाव, पाथर्डीचे नेते अ‍ॅड. शिवाजी काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून पोलीसांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे.

तसेच अ‍ॅड. शिवाजी काकडे व जि.प. सदस्या हर्षदाताई काकडे यांच्या माध्यमातून गाव पातळीवर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी कार्य सुरु असल्याचे स्पष्ट केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe