जिल्ह्याच्या विकासात जिल्हा बँकेचे योगदान- बाळासाहेब थोरात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- जिल्ह्याच्या विकासात नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मोठे योगदान आहे. या बँकेला मोठी परंपरा लाभलेली आहे. बँकेचे कामकाज आजवर शिस्तीनेच चालले. पुढेही ही शिस्त कायम राहील.

नवीन पिढीचे संचालक बँकेचा पुढील कारभार चांगल्या पद्धतीने करतील आणि बँकेला आणखी उंचीवर पोचवतील, अशी अपेक्षा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बँकेची सभा आज ऑनलाइन पद्थतीने पार पडली.

बँक नेहमीच राजकारण विरहित कामकाज करत असून बँकेने आता सेवकांना प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याची भूमिकाही थोरात यांनी व्यक्त केली. राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही मार्गदर्शन केले.

राज्यात मोठ्या प्रमाणात वीज बिलाची थकबाकी असून बँकेने शेतकर्‍यांसाठी वीज बिल भरण्यास कर्ज योजना राबवणे गरजेचे आहे. वीज बिल थकित रकमेतून आलेल्या वसुली रकमेतून जिल्ह्यातील विजेसाठीच्या पायाभूत सुविधासाठी या रकमेचा वापर होईल, असे तनपुरे म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe