जिल्हा सहकारी बँक; एवढ्या जागांसाठी होणार मतदान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. काल दुपारी तीन वाजेपर्यंत 21 संचालकांच्या जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

आता केवळ चार मतदार संघात निवडणूक लागली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज सकाळपासून नगरमध्ये हजर होते.

थोरात यांनी नगरमध्ये उपस्थित राहून राजकीय वातावरणच आढावा घेतला तसेच काही सूत्रे देखील फिरवली. परिणामी, भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखेे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत काहीसे बॅकफूटवर गेले.

महिला राखीव गटातून अनुराधा नागवडे या बिनविरोध झाल्या आहेत. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह 17 जागा बिनविरोध झाल्या.

माजी आमदार वैभव पिचड, वैभव पाचपुते व प्रवीण कुरुमकर यांनी माघार घेतली. दरम्यान 21 संचालकांच्या जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत तर उर्वरित कर्जत सेवा सोसायटी मतदार संघ,

नगर सेवा नगर सेवा सोसायटी मतदार संघ आणि पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघ यासह बिगर शेती मतदारसंघ या चार मतदार संघात निवडणूक लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe