जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरग (54 वर्षे) यांचे शनिवारी पहाटे उपचारादरम्यान ससून रुग्णालयात निधन झाले. गेल्या रविवारी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

सरग यांना चांगले उपचार मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी खूप प्रयत्न केले, पण त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही.

शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरग हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील होते. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद येथील एका वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली होती.

त्यानंतर राज्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची माहिती संचालनालयात नियुक्ती झाली. दरम्यान कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राजेंद्र सरग यांचा नुकताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe