अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- सामाजिक संस्थांनी शासनाचे प्रकल्प पारदर्शकतेने राबवावे. शासनाच्या योजनांचा लाभ खर्या अर्थाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी शासन आणि समाज यांचा दुवा म्हणून सामाजिक संस्थांनी कार्य केल्यास शासनाच्या योजना यशस्वी होणार आहेत.
जय असोसिएशन ऑन एनजीओ महाराष्ट्र राज्य संलग्न संस्था अतिशय कृतिशीलपणे समाजाच्या तळागाळा पर्यंत जाऊन कार्य करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांची नागपूर येथे उपसंचालकपदी पदोन्नती झाल्याबद्दल जय असोसिएशन ऑन एनजीओ महाराष्ट्र राज्य संलग्न संस्थांच्या वतीने वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील बोलत होते. यावेळी जय असोसिएशनचे राज्य अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल, अॅड. अनिता दिघे, विनायक नेवसे, संजय भिंगारदिवे, प्रमोद डांगे, क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने,
प्रकाश मोहरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, बाळासाहेब पवार, पोपट बनकर आदी उपस्थित होते. शेखर पाटील यांचा जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला. तर गेल्या नऊ वर्षापासून क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नंदकिशोर रासने सेवानिवृत्त झाले असता त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रीडा अधिकारी रासने यांनी अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक संस्था अतिशय समन्वयाने शासनाबरोबर कार्य करीत आहे. शासनाच्या योजना प्रभावीपणे यशस्वी होण्याकरिता लोकसहभागासाठी कृतिशील संस्थांचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे सुरु असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
अॅड. महेश शिंदे यांनी सामाजिक संस्था क्रीडा क्षेत्रातील योजना, युवक कल्याण, व्यायाम शाळा, क्राडांगण, क्रीडा सुविधा, युवा सप्ताह, युवा महोत्सवात आदी उपक्रम दरवर्षी उत्सफुर्त सहभागातून राबवित आहे.
त्याचबरोबर कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे रखडलेली युवक कल्याण योजनाचे प्रकल्प जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यासाठी मंजूर झाल्याचे विशेष नमुद करुन त्यांचे स्वयंसेवी संस्थांच्या वतीने आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड. भानुदास होले, अॅड. पुष्पा जेजुरकर, अॅड. गौरी सामलेटी, अॅड. प्रणाली चव्हाण, रजनी ताठे, अशोक कासार, आरती शिंदे, नयना बनकर, सागर अलचेट्टी,
डॉ. भगवान चौरे, मीना म्हसे, उषा कपिले, जयश्री कुलथे, बाबू काकडे, सुभाष काकडे, किरण सातपुते, वर्षा काळे, प्रिती औटी, भीमाशंकर देशमुख, अॅड. सुनील तोडकर या संस्था प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम