दिव्यांगांनी स्वत:हून मनपात नोंदणी करुन घ्यावी-अ‍ॅड.लक्ष्मण पोकळे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे दिव्यांग बांधव राहत असून, या दिव्यांग बांधवांचे नोंदी अद्याप पावेतो महापालिकेने त्यांच्या रेकॉर्डला घेतलेला नाही. दिव्यांगाच्या सर्वांगिन विकासाकरीता केवळ सहानभुतीचा दृष्टीकोन न ठेवता त्यास संवाधिक आधार कसा मिळेल हे पहावे.

दिव्यांग कायद्याप्रमाणे दिव्यांगाच्या कल्याणसाठी 5 टक्के निधी अपंग कल्याणार्थ राखून ठेवणे गरजेचे आहे. सदर निधीचा उपयोग दिव्यांगांना होणेकरीता दिव्यांगांची पालिकेमध्ये नोंद होणे ही अतिशय गरजेचे आहे.

महाराष्ट्र शासन निर्णय नगर विकास विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे जन्म-मृत्यू नोंदीप्रमाणे अपंगाची नोंद अहमदनगर महानगरपालिकेमध्ये करणे अत्यंत आवश्यक असतांना महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असून,

तरी दिव्यांग बांधवांनी स्वत:हून महानगरपालिकेमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकाडे व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे घेऊन

महापालिकेतील दिव्यांग कक्षाशी मो.8308330827 या नंबरवर संपर्क करुन आपली करुन घ्यावी, असे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे अ‍ॅड.लक्ष्मण पोकळे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe