Income Tax : सध्या बराच नोकरदारवर्ग असो किंवा व्यावसायिक वर्ग आयकर भरत आहेत. परंतु, असेही काही लोक आहेत जे दरवर्षी आयकर भरतच नाही. त्यामुळे त्यांना दंड भरावा लागत आहे. अशातच आता लवकरच आयकर विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात होणार आहे.
यावर्षी 1 एप्रिल 2023 पासून आयकर भरता येणार आहे. सध्या करदात्यांना दोन कर प्रणालींद्वारे आयकर रिटर्न भरता येणार आहे. एक म्हणजे जुनी कर व्यवस्था तर दुसरी म्हणजे नवीन कर व्यवस्था. परंतु, तुम्हीसुद्धा तुमचा कर वाचवू शकता. कसे ते जाणून घेण्यासाठी ही बातमी काळजीपूर्वक वाचा.

आयकर विवरणपत्र भरताना मिळेल सवलत
तुम्ही जर वैयक्तिक कर या वेळी जुन्या कर प्रणालीद्वारे भरला गेला, तर तुम्हाला अनेक प्रकारची सूट मिळू शकते. या सवलतींद्वारे आयकर विवरणपत्र भरताना कर वाचवता येतो. त्यामुळे आता जर तुम्हाला जुन्या कर प्रणालीमध्ये कर भरताना कर सवलतीचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही या सोप्या पद्धतींद्वारे कर वाचवू शकता.
कर सवलत
तुम्हाला आता आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळू शकते. कारण EPF, PPF इत्यादीसारख्या भविष्य निर्वाह निधीमधील गुंतवणूक, जीवन विमा प्रीमियमसाठी केलेले पेमेंट, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS), गृह कर्जाची मुद्दल रक्कम, SSY, NSC, SCSS इत्यादी करमुक्त आहेत. तुम्ही त्यात गुंतवणूक करून कर सवलत मिळवू शकता.
कर लाभ
तसेच कलम 80CCC अंतर्गत, पेन्शन योजना तसेच म्युच्युअल फंडांना केलेल्या पेमेंटवर कर सवलत मिळू शकते. तर, नॅशनल पेन्शन सिस्टीम, अटल पेन्शन योजना इत्यादीसारख्या काही सरकारी-समर्थित योजनांसाठी केलेल्या पेमेंटवर कलम 80CCD(1) अंतर्गत कर सवलत मिळू शकते.
आयकर
कलम 80CCD(1B) अंतर्गत, NPS मध्ये 50,000 रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला या कलमांतर्गत सूट देण्यात आली आहे. तर कलम 80CCD(2) मध्ये, NPS मध्ये नियोक्त्याचे योगदान (10% पर्यंत, ज्यात मूळ पगार आणि महागाई भत्ता, असल्यास) या श्रेणी अंतर्गत सूट दिली आहे. त्यामुळे आता या कलमांतर्गत कर सवलत सहज मिळू शकते.