Sanjay Raut : ‘मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही पळवतात, त्यांची मेगा भरती कुचकामी आहे’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sanjay Raut : काल राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. यावरून चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

राऊत म्हणाले, मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही पळवायला लागले, सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांचे चिरंजीव शिवसेनेत नव्हते. सुभाष देसाईंनी निवदेन जारी करत भूषण देसाई हे शिवसेनेचे सदस्य नव्हते, हे स्पष्ट केले आहे.

पण मिंधे गट कधी बाप पळवतात. आता मुलंही पळवायला लागले आहेत. त्यांची ही मेगा भरती सुरू आहे, ती कुचकामी आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु आहे.

असे असताना उध्दव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्ये एकच खळबळ माजली आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी संपावर जात आहेत. शेतकरी लाँग मार्च घेऊन मुंबईत धडकत आहेत, याच अर्थ महाराष्ट्र खदखदतोय. जनतेच्या मनातील सरकार आम्ही सत्तेवर आणले असे म्हणत होते. पण जनतेच्या मनातील सरकार असते तर जनता रस्त्यावर उतरली नसती.

हे सरकार शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विरोधातील आहे. देशाच्या संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर राजकीय विरोधकांना संपवण्याचा डाव सुरु आहे. त्याच्याविरोधात राहुल गांधी बोलले. देशात रोज लोकशाहीची हत्या होत आहे, असेही ते म्हणाले.