श्रावण महिन्यात करा ‘हे’ उपाय ; सर्व समस्या होतील दूर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- भगवान शिव शंकरांच्या भक्तीसाठी सर्वात खास मानल्या जाणार्‍या श्रावण महिना येण्यास काही दिवस शिल्लक आहेत. या महिन्यात सर्व सोमवारी उपवास करुन देवाची उपासना केल्यास भरपूर पुण्‍य मिळते.

भगवान शिव यांच्या कृपेने सर्व कामे पूर्ण होतात. असे म्हटले जाते की, संपूर्ण चार्तुमास मध्ये या जगावर राज्य करणारे शिव या काळात केल्या गेलेल्या पूजेवर त्वरीत प्रसन्न होतात आणि सर्व अडचणी दूर करून भक्ताच्या इच्छेची पूर्ती करतात.

ज्योतिषशास्त्रात, विविध इच्छांच्या पूर्ततेसाठी, श्रावण महिन्यात करावयाचे काही उपाय सांगितले आहेत.

आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा – आनंदी जोडप्यासाठी: ज्या जोडप्यांना आपल्या वैवाहिक जीवनात समस्या उद्भवतात त्यांनी या महिन्यात पंचमृतने शिवलिंगाचा अभिषेक करावा. यामुळे त्यांच्या जीवनात आनंद होईल. लक्षात ठेवा पती-पत्नीने एकत्र अभिषेक केला पाहिजे.

पैशाची तंगी दूर करण्यासाठी: व्यवसायात नुकसान झाल्यामुळे किंवा नोकरीतील अडचणींमुळे पैशांची कमतरता भासल्यास या महिन्यात उपाय केल्यास चांगला फायदा होईल. आर्थिक अडचणीपासून मुक्त होण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी डाळिंबाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करा.

जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी: आयुष्यात पुन्हा पुन्हा अडचणी येत असतील, जर काम होत नसतील तर, विवाहित जोडप्याने श्रावण महिन्याच्या सर्व सोमवारी भगवान शिव आणि आई पार्वतीला तांदळाची खीर अर्पण करावी.

हा उपाय जीवनातील सर्व समस्या दूर करतो. – रोग बरे करण्यासाठी: आपल्याला एखादा गंभीर आजार असल्यास किंवा पुन्हा पुन्हा आजारी पडत असंल्यास, या दोन्ही परिस्थितींपासून मुक्त होण्यासाठी, श्रावण महिन्यात, काळ्या तीळात मिसळलेल्या पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा. या उपायाने भरपूर आराम मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe