PF Rules : तुमचेही पीएफमध्ये पैसे आहेत? नवीन नियमांचा असा होणार परिणाम

Published on -

PF Rules : आता देशातील नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी यावेळी एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या खिशावर होणार आहे.

त्यांनी या घोषणेत आता पॅन कार्ड नसलेल्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) काढण्यावरील TDS दरात कपात करणार असल्याचे सांगितले होते. याचा पगारदार व्यक्तींवर कसा आणि किती परिणाम होईल ते सविस्तरपणे जाणून घेऊयात.

अर्थसंकल्पीय भाषणात दिली ही माहिती

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात असे सांगितले होते की, सध्या पॅन नसलेल्या प्रकरणांमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतून करपात्र घटक काढण्यावर टीडीएस दर 30% इतका केला आहे. पॅन नसलेल्या इतर प्रकरणांप्रमाणे तो 20% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे.

परंतु, काहीवेळा मागच्या वर्षी कर आधीच भरलेला असतो तेव्हा उत्पन्नासाठी नंतर कर वजा केला जातो. अशा करदात्यांना मागच्या वर्षी या TDS साठी क्रेडिटचा दावा करण्यासाठी सुविधा देण्यासाठी ही दुरुस्ती प्रस्तावित केलेली होती.

टीसीएस 

जेव्हा प्राप्तकर्ता नॉन-फाइलर असतो तेव्हा उच्च टीडीएस/टीसीएस दर लागू होतो, ज्याने मागच्या वर्षासाठी त्याचा आयटीआर दाखल केलेला नाही आणि टीडीएस/टीसीएसची एकूण रक्कम रु. ५०,००० किंवा त्यापेक्षा खूप जास्त असते. अशातच आता अशा व्यक्तीला वगळण्याचा प्रस्ताव आहे, ज्यांना अशा मागच्या वर्षाच्या उत्पन्नाचा तपशील भरण्याची गरज नाही आणि ज्यांना शासनामार्फत अधिसूचित केले आहे.

पीएफ

EPFO द्वारे TDS कापल्यानंतर, कर भरणाऱ्यांना एक प्रमाणपत्र देण्यात येते. परताव्याचा दावा करण्यासाठी आयकर रिटर्न (ITR) भरताना हे TDS प्रमाणपत्र सादर करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आता ईपीएफ खात्यातून पैसे काढल्यावर कोणताही टीडीएस कापला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी ईपीएफ खातेधारकाद्वारे विशेषतः फॉर्म 15एच किंवा फॉर्म 15जी सबमिट केला जाऊ शकतो.

आयकर रिटर्न

फॉर्म 15G हा 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी लागू आहे तर फॉर्म 15H 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींसाठी लागू आहे. खाते उघडल्यानंतर 5 वर्षांच्या आत EPF काढल्यावर TDS कापण्यात येतो.

जर पॅन कार्ड उपलब्ध असेल तर पैसे काढण्याची रक्कम रु. 50,000 पेक्षा जास्त असेल तर TDS कपातीचा दर 10% आहे. तसेच जेथे पॅन कार्ड उपलब्ध नव्हते/पीएफ खात्याशी लिंक केलेले नव्हते, त्यांच्यासाठी पैसे काढण्यासाठी टीडीएस दर 30 % होता, जो आता 20 % केला आहे.

ईपीएफ

समजा जर तुम्ही तुमच्या EPF खात्यातून पैसे काढण्याचा विचार करत असाल तर खाते पॅन कार्डशी लिंक केलेले असावे. नाही तर तुम्हाला 1 एप्रिल 2023 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे, जेव्हा नवीन आर्थिक वर्षात नवीन तरतुदी लागू होतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe