अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- मेरे देशवासियो… मेरे प्यारे भाई – बेहनो… असे शब्द आपण नक्कीच ऐकले असतील… हे शब्द ऐकताच एकच चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होय…आपल्या भाषणाने संबंध देशातील जनतेला मोहित करणारे देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची नेहमीच चर्चा होत असते.
तर आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडला असते कि मोदींचे भाषणे नेमके कोण लिहितात? तर याविषयी काही माहिती आपण जाणून घेऊ …
पंतप्रधान कार्यालयात आरटीआयच्या माध्यमातून पंतप्रधानांचे भाषण कोण लिहून देतो आणि त्यावर काय खर्च येतो, अशी माहिती विचारली होती.
त्यावर पंतप्रधान कार्यालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी कोणत्या इव्हेंट म्हणजे कार्यक्रमात भाग घेणार आहे, त्यावर त्यांचं भाषण अवलंबून असतं.
कार्यक्रम काय आहे? त्याचं स्वरुप काय आहे त्यावर विविध विभागातील अधिकारी, संस्था, विभाग, संघटना पंतप्रधानांना इनपुट देत असतात.
मोदी हे सर्व इनपुट वाचून त्या आधारे आपलं भाषण तयार करतात, असं पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. मात्र मोदींच्या विविध प्रसंगी होणाऱ्या भाषणांवरील खर्चाची माहिती देण्यात आलेली नाही.
विविध स्त्रोतांकडून इनपुट मिळाल्यानंतर मोदी भाषणाला अंतिम स्वरुप देतात असं या उत्तरात म्हटलं आहे. त्यामुळे मोदींच्या भाषणावर किती खर्च येतो हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून ते मोदींपर्यंत पंतप्रधानांच्या प्रत्येक भाषणासाठी पार्टी युनिट्स, विविध मंत्रालये, संबंधित विषयाचे तज्ज्ञ,
पंतप्रधानांसाठी काम करणारी खासगी टीम आदी भाषणांचे इनपुट देत असतात. नेहरूंच्या काळापासूनची ही पद्धत आजही सुरू आहे, असंही आरटीआयच्या उत्तरात म्हटलं आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|