कुणी पगार देता का पगार…!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  एकीकडे जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणारा कर्मचारी वर्ग आणि दुसरीकडे विनाअनुदानित शाळेतील कर्मचारी कुणी पगार देता का .. पगार .. असे म्हणतच निवृत्त होऊ लागला आहे.

असे विदारक चित्र सध्या समोर येत आहे. सुमारे २० ते २५ वर्षां पासून विनाअनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा पगारासाठी संघर्ष सुरु आहे. पगारा अभावी अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून राज्यात सुमारे ४० हून अधिक शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत .

खासगी शाळांमधून विद्यार्थ्यांची होणारी लुटमार लक्षात घेता राज्यातील अनेक शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा धंदाच सुरु केला आहे. १९९७ – ९८ पासून माध्यमिक शाळांच्या स्थापनेचे पेव फुटले.शासनाने कायम विना अनुदानित तत्वाने मागेल त्यांना शाळा देण्याचे धोरण अवलंबले.

यातूनच राज्यात सुमारे साडेसात ते आठ हजार माध्यमिक शाळा सुरु करण्यात आल्या. आज त्याला २० ते २५ वर्षे होऊनही या शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना अद्यापही शंभर टक्के वेतन मिळत नाही .

मार्चे आंदोलने करून सप्टेंबर २०१६ पासून केवळ २० टक्के अनुदान मिळाले आहे. या २० टक्के पगारातून संस्थाकडून होणारी कपात व प्रत्यक्ष हातात मिळणाऱ्या रकमेतून संसाराचा गाडा हाकताना मोठी कसरत करावी लागत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe