अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीवर आले संकट ! जेलमध्ये असतानाच झाले असे काही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीवर मोठे संकट आले आहे,अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या अरुण गवळी नागपूर कारागृहात आहेत. त्याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान एकाच वेळी पाच कैद्यांना कोरोना झाल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. सर्वांना कारागृहातच विलगणीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अरुण गवळीला कोरोनाची लक्षण दिसली होती. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली असून चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दोन दिवसांपूर्वी अरुण गवळी याची प्रकृती खालावली होती. त्यामुळे गवळी याच्यासह अन्य कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आज आला. यात अरुण गवळीसह पाच जणांना करोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

या पाचही जणांचे विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या पाचही जणांची प्रकृती सध्या स्थिर आहे.या पाचही जणांचे कारागृहात वेगवेगळ्या बॅरेकमध्ये विलगीकरण करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

लॉकडाऊन मध्ये मुलीचा विवाहसोहळा :- अरुण गवळी पॅरोलवर असतानाच लॉकडाऊनच्या काळात त्याच्या मुलीचा विवाहसोहळा देखील संपन्न झाला. अभिनेता अक्षय वाघमारेसोबत योगिता गवळी 8 मे रोजी विवाहबद्ध झाली.कन्यादान करताना अरुण गवळी भावूक झाल्याचंही दिसलं होतं. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच झालं होत.

कोण आहे अरुण गवळी ? कुख्‍यात डॉन अरुण गवळी 80 आणि 90 च्‍या दहशकात मुंबईतील भायखळा या स्‍लम एरियात राहून घरोघरी दूध पोहोचवण्याचे काम करत होता. पुढे आपल्या क्रुर कृत्यामुळे तो गुन्हेगारी जगताचा बादशाह झाला. आता ‘डॅडी’ या नावाने त्‍याची ओळख असून, नागपूरच्‍या कारागृहात शिवसेनेच्‍या नगरसेवकाच्‍या खुन प्रकरणात तो शिक्षा भोगत आहे.

दाऊद दुबईत पळून गेल्यावर गवळीचे एकतर्फी राज :- 1993 मध्ये जेव्हा मायानगरी मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा तेव्हा अंडरवर्ल्डचे सारे समीकरण बदलून गेले होते. बॉम्बस्फोटाच्या आधीच दाऊद दुबईला पळून गेला. दाऊद आणि छोटा राजन वेगवेगळे झाले. छोटा राजनने आपला मलेशियात व्यवसाय सुरू केला. त्यामुळे अरुण गवळीला मुंबईत आपले साम्राज्य उभे करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला गवळीचा कारभार दगडी चाळीतून चालत असे. दरम्यान, त्याला शेकडो गुंड येऊन मिळाले व तोही अट्टल गुन्हेगार बनला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe