Avoid Things After Yoga : निरोगी शरीरासाठी व्यायामाचा सल्ला दिला जातो, काही जण जिममध्ये घाम गाळतात, तर काहीजण योगा करण्यास प्राधान्य देतात. योगा करण्याचे काही नियम आहेत, तसेच योगा केल्यानंतरही काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा यामुळे आपल्याला चांगलेच नुकसानाला समोरे जावे लागते. आजच्या या लेखात आम्ही योगा केल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग…
खरं तर योगासन करण्यापूर्वी आणि नंतर, कोणत्या गोष्टी करता येतील आणि कोणत्या नाहीत हे जाणून घेणे लोकांना खूप महत्त्वाचे आहे. कारण या चुका शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.
योगा केल्यानंतर “या” गोष्टी टाळा
जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी योगाभ्यास करत असाल तर लक्षात ठेवा की यानंतर लगेच पाण्याचे सेवन करू नका. असे केल्याने घशात कफ जमा होतो. अशा परिस्थितीत योग करूनही तुम्ही निरोगी राहू शकणार नाही. त्यामुळे योगानंतर काही वेळानेच पाणी प्या.
सकाळी योगा करणाऱ्यांसाठी हे खास आहे. जर तुम्ही सकाळी एक किंवा अर्धा तास योगा केलात तर 2-3 तासांनीच आंघोळीला जा. कारण योगा केल्याने शरीराची भरपूर ऊर्जा खर्च होते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. म्हणूनच योगाभ्यास केल्यावर लगेच आंघोळ करू नये.
जर तुम्ही योगा करून उठला असाल तर काही वेळ भूकेवर नियंत्रण ठेवा. योगानंतर लगेच जड खाल्ल्याने अपचन होऊ शकते. म्हणूनच तुम्ही काही वेळ वाट पाहिल्यानंतर जेवता. म्हणजेच योगासनाच्या किमान अर्ध्या तासानंतरच अन्न खावे.
इतर कोणत्याही व्यायामाप्रमाणे, योग सत्रानंतर आराम करणे आवश्यक आहे. जेणेकरून शरीराच्या स्नायूंना बरे होण्यासाठी वेळ मिळेल आणि ते शांत होऊ शकतील. म्हणून योगा केल्यानंतर काही वेळ आराम करा.
लक्षात घ्या योगा केल्यानंतर काही वेळाने जेवू शकता, पण त्यापूर्वी तीन तास जेवू नका.