औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकवून महाराष्ट्राला खिजवू नका, तुम्हालाही त्याच कबरीमध्ये जावे लागेल

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना एमआयएमचे (MIM) नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर माथा टेकल्याप्रकरणी खोचक टीका केली आहे.

हे रितीरिवाज नाहीत, वारंवार औरंगाबादला यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला (Maharashatra) खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे. अशातून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची असे काहीतरी ओवेसी बंधू यांना करायचे आहे.

पण मी आज इतकेच सांगेन की ज्या औरंगजेबाच्या कबरी पुढे तुम्ही आज नमाज पढत आहात, त्या औरंगजेबाला कबरीमध्ये मराठ्यांनी टाकले आहे. कधीतरी तुम्हाला देखील त्याच कबरीमध्ये जावे लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला यावेळी दिला आहे.

त्याचबरोबर संजय राऊत यांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, काश्मिरी पंडितांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) अधिक इमोशनल आहेत.

त्यांनी सहा सात वर्षांत काय केलं माहीत नाही. पण अजूनही काश्मिरी पंडिताची हत्या झाली आहे. काल एका सरकारी कर्मचाऱी असलेल्या काश्मिरी पंडिताची हत्या झाली आहे.

ज्याप्रकारे ही हत्या झाली, ते चिंताजनक आहे. याची शहांनी याची गंभीर दखल घ्यावी. नेहमी पाकिस्तानकडे बोट दाखवण्याची गरज नाही. आपण काश्मिरी पंडितांसाठी काय करणार आहोत? ३७० नंतरही काश्मिरी पंडित आणि सामान्य जनता सुरक्षित नाहीये. काश्मिरात अस्थिर आणि अशांततेचा माहोल आहे, असेही संजय राऊत बोलताना म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe