राजकारण करू नका,’आम्ही जनतेसाठी लढतो – खासदार सदाशिव लोखंडे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- कोरोना परिस्थिती नियंत्रणात प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला.

कोरोना आढावा बैठकीत हा प्रकार घडला. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने सुखदान यांना शाई फेकता आली नाही.

तालुक्यातील कोरोना विषयक परिस्थितीची आढावा बैठक नेवासा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात झाली.

या आढावा बैठकीच्या प्रसंगी बहुजन वंचित आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी ‘बैठक घ्यायला उशीर का लावला’ याबद्दल जाब विचारला.

तालुक्यात रेमडेसिवीर इंजेक्शन अभावी लोक मरतायेत, ऑक्सिजन मिळत नाही, तुम्ही करताय काय, असा सवाल करत खा. लोखंडेंवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांना अडविल्याने हा प्रयत्न अयशस्वी झाला. कोरोनाच्या संदर्भात नेवासा तालुक्यातील परिस्थितीबाबत खासदार लोखंडे चर्चा करत आढावा घेत होते. त्याचवेळी सदर प्रकार घडला.

त्यानंतर खासदार लोखंडे यांनी यात राजकारण करू नका, असे सांगताच ‘आम्ही जनतेसाठी लढतो, वैयक्तिक माझा काही स्वार्थ नाही, जे चांगले काम करतात त्यांचे आम्ही कौतुक करतो.

तुमची तालुक्यात भूमिका काय? असा सवाल सुखदान यांनी केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News