आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांना मजबूर करू नका… शेतकरी नेते अजित नवलेंचा इशारा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- लॉकडाऊनचा गैरफायदा घेत खाजगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर प्रति लिटर 10 ते 18 रुपयांनी पाडले असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

लॉकडाऊनचा बाऊ करून हे दर पाडले असून यातून अमाप नफा कमवला. शेतकऱ्यांवर होणार हा अन्याय सहन केला जाणार नाही. पुन्हा एकदा पुणतांबा आंदोलन करणयासाठी शेतकऱ्यांना मजबूर करू नका, असे शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकारला ठणकावले.

वैजापूर तालुक्यातील लाखगंगा गावात आज दूध दरवाढ व इतर मागण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. लाखगंगा गावच्या सरपंच उज्वला सचिन पडोळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा सपन्न झाली.

या ग्रामसभेतील ठराव वाचन ग्रामविकास अधिकारी एस. जे. राठोड यांनी केले तर या ठरावाचे सूचक राजेंद्र तुरकने तर अनुमोदन विलास मोरे यांनी दिले. या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थ मिळून एक मताने दूध दरवाढ, लॉकडाऊनचा या गैरफायदा घेत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर 10 ते 15 रुपयांनी पाडले आहेत.

लॉकडाऊन पूर्वी शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधासाठी 30 ते 38 रुपये दर मिळत होता. लॉकडाऊन जाहीर होताच टप्प्याटप्प्याने हे दर संघटितरीत्या पाडण्यात आले असून ते 20 ते 22 रुपये प्रति लिटर वर आणण्यात आले आहेत. खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी संघटितरीत्या दर पाडले असून

यातून अमाप नफा कमवला. या लुटमारीच्या विरोधामध्ये राज्यव्यापी संघर्ष उभा करण्याची भूमिका घेत दरवाढ मिळावी. लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादकांच्या झालेल्या लुटीची चौकशी करा, दोषींवर कारवाई करा व दुध उत्पादकांची केलेली

लूट वसूल करून ती परत करा, अशी लूट रोखण्यासाठी कायदे करा. या प्रमुख मागण्या करणारा ठराव ग्रामसभा घेऊन करण्यात आले. तर राज्यव्यापी आंदोलन उभारणार असे किसान सभेचे अजित नवले यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe