माजी आमदार कोल्हे यांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीची दुरवस्था झाली होती. या इमारतीच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस आणि या खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे ३० मे २०१६ रोजी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून या कामासाठी निधी मिळवला होता.

निधीतील पहिल्या रकमेचा हप्ता २ कोटी रुपये प्राप्त झाला आहे. कोपरगाव नगरपरिषदेच्या इमारतीसाठी निधी मिळावा म्हणून तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.

त्या केलेल्या मागणीमुळे नगरपरिषद इमारतीच्या कामासाठी निधीची मंजुरी मिळवलेली आहे. मंजूर झालेल्या निधीतील रक्कम टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहे

म्हणून हा निधी आम्ही मिळवल्याची टिमकी वाजवून श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये, अशी टीका कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe