डॉ. गणेश शेळके आत्महत्या प्रकरण : आरोग्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्याप्रकरणी

तालुका आरोग्य अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तांना दिले आहे.

डॉ. शेळके यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट प्रमाणे एकही वरिष्ठ अधिकार्‍यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.

डॉ. शेळके यांना न्याय मिळवून देण्यासाठी दहातोंडे यांनी आरोग्य मंत्री टोपे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन

संबंधित सर्व अधिकांर्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच डॉ. शेळके यांच्या कुटुंबीयांना तात्काळ 50 लाखांची मदत करण्यात

यावी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तात्काळ शासन सेवेत घेण्यात यावे, अन्यथा मंत्रालयासमोर बहिरवाडी, डांगेवाडी, करंजी ग्रामस्थांसह महासंघाचे पदाधिकारी मोर्चा काढतील, असा इशारा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe