नगर शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणी डॉ. शेळकेंच्या एका कर्मचाऱ्याला अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना बोगस कर्ज प्रकरण करून डॉक्टर निलेश शेळके यांच्यासह शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सव्वासतरा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी आरोपी डॉ. निलेश शेळके याच्या एका कर्मचार्‍याला आर्थिक गुन्हे शाखेने नुकतेच अटक केली आहे. मधुकर वाघमारे असे या अटक केलेल्या कर्मचार्‍याचे नाव असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. अहमदनगर शहर सहकारी बँकेतील सुमारे 17 कोटींच्या कर्ज फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.

आतापर्यंत या गुन्ह्यात डॉ. शेळकेसह डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे, योगेश मालपाणी यांना अटक करण्यात आली आहे. शेळकेंच्या आर्थिक व्यवहारांमध्ये वाघमारेचा समावेश या प्रकरणाचा तपास करताना डॉ. शेळके याच्या बँक खात्यातील व्यवहार,

कर्जांची कागदपत्रे, बँकेतून रकमा काढणे आदी व्यवहारांमध्ये मधुकर वाघमारे याचा समावेश आढळून आला आहे. धनादेशावर डॉ. शेळके याच्या सह्या असल्या, तरी प्रत्यक्षात बँकेतून व्यवहार वाघमारे याने केले असल्याचे समोर आले आहे. त्याच्या खात्यामध्ये काही रक्कम वर्ग झाली असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News