प्रेमदान चौक येथील डॉ. मोरेज हॉटेल पुजा पॅलेसचा शुभारंभ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- गेल्या पंधरा वर्षापासून कीर्ती उद्योग समुहातंर्गत शहरात हॉटेल व्यवसायाची सेवा देऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या व नगरकरांना स्वच्छ व स्वादिष्ट खाद्यसेवा देण्यासाठी सावेडी रोड, प्रेमदान चौक येथे सुरु करण्यात आलेल्या डॉ. मोरेज हॉटेल पुजा पॅलेसचा शुभारंभ आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते झाला.

तर ग्राहकांना ऑनलाईन पार्सलची खाद्य सेवा पुरविण्यासाठी हॉटेलच्या वेबसाईटचे अनावरण डॉ.एस.एस. दिपक, डॉ.अनिल आठरे पाटील व डॉ.बापूसाहेब कांडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी हॉटेलचे संचालक डॉ. अविनाश मोरे, इंजि. आदित्य मोरे,

सुनिल शिरसाठ, नगरसेवक सचिन जाधव, निखील वारे, बाळासाहेब पवार, सुनिल त्रिंबके, विनीत पाऊलबुध्दे, अ‍ॅड. धनंजय जाधव, उद्योजक दिपक लांडगे, अनिकेत चेमटे, संपत नळवडे, अजय पंजाबी, मुन्नाशेठ चमडेवाले,

विश्‍वनाथ अण्णा राऊत आदी उपस्थित होते. आमदार अरुणकाका जगताप म्हणाले की, नगरच्या हॉटेल व्यवसाया मधील स्वाद व दर्जेदार खाद्याची कीर्ती संपुर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे.

डॉ. मोरे यांच्या हॉटेल उद्योग समुहाने नगरकरांसह राज्यातील खवय्यांच्या जीभेवर अधिराज्य गाजवले आहे. काही तरी नवीन खाद्य देण्याची नेहमीच डॉ. मोरे यांची धडपड असते. चोखंदळ ग्राहकांना दर्जेदार खाद्य मिळत असल्याने त्यांच्या हॉटेल व्यवसायाची कीर्ती चहूकडे असून,

नवीन हॉटेल देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. एस.एस. दीपक यांनी डॉक्टर क्षेत्रातील व्यक्ती हॉटेल व्यवसायात संपुर्ण महाराष्ट्रभर नांवलौकिक कमवतो, या मागे तो देत असलेल्या आरोग्यदायी सेवा हे प्रमुख कारण आहे.

डॉ. मोरे स्वत: डॉक्टर असल्याने ग्राहकांच्या आरोग्याप्रती जागृक राहून खाद्याबाबत काळजी घेत आहे. काळाची पाऊले ओळखून त्यांनी सुरु केलेली ऑनलाईन पार्सल सेवेला देखील चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी डॉ. मोरे यांना पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या. डॉ. अविनाश मोरे म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षापासून कीर्ती उद्योग समुहाच्या माध्यमातून नगरकरांना दर्जेदार, स्वच्छ, स्वादिष्ट व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यसेवा पुरविली जात आहे.

दर्जेदार सेवा देत असताना हॉटेल नगरकरांच्या पसंतीस उतरले. तोच स्वाद आणि सेवा घेऊन नगरकरांना नवीन खाद्य देण्याच्या उद्दीष्टाने डॉ. मोरेज हॉटेल पुजा पॅलेसची सुरुवात करण्यात आली आहे.

नगरमध्ये आलेले मंत्री, राजकीय नेते, पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी व सेलिब्रेटी कीर्ती उद्योग समुहाच्या हॉटेलमध्ये जेवल्याशिवाय जात नाही. यामागे उत्तम दर्जा, आरोग्यदायी सेवा व मैत्रीचा ओलावा हे प्रमुख कारण आहे.

नगरकरांसाठी लवकरच बांबू बिर्याणी, लाईव्ह फिश, तीतर डिश देण्याची तयारी आहे. टाळेबंदीत हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला, यातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास अ‍ॅड.शिवजीत डोके, अ‍ॅड. मनोज देशमुख, अ‍ॅड. विक्रम वाडेकर, प्रा. संजय पाटील आदिंसह नगरमधील राजकीय व अधिकारी वर्गा उपस्थित राहून डॉ. मोरे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किर्ती उद्योग समुहाचे सहकारी व कर्मचारींनी परिश्रम घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe