लॉकडाऊनआधी कठोर पावले; बाजारपेठेत जाण्यासाठी प्रति तास ५ रुपये मोजावे लागणार !

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नाशिकमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले टाकली आहेत.

बाजारात प्रवेश हवा असेल तर आता थेट पैसेच मोजावे लागणार आहेत. बाजारात जायचे असल्यास प्रति तास पाच रुपये शुल्क आकारले जाणार असून एक तासापेक्षा जास्त वेळ बाजारात थांबल्यास ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे.

नाशिक शहरात वाढत्या कोरोना संसर्गामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहे. बाजारपेठेत जाण्यासाठी प्रति तास पाच रुपये प्रतिव्यक्ती आकारले जाणार असून महापालिका आणि पोलीस संयुक्त कारवाई करणार आहे.

शहरातील शालिमार, नवापुरा, बादशाही कॉर्नर येथे पोलिसांची बॅरिकेडिंग. महापालिकेचा प्रत्येक पॉइंटवर टेंट असणार आहे. बाजारपेठेतील व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना भद्रकाली पोलीस स्टेशनकडून पास दिले जाणार.

पासधारकांनाच असेल प्रवेश असणार आहे. मेनरोड, सिटी सेंटर मॉल, पंचवटी बाजार समितीमध्ये हा निर्णय लागू राहणार असून सकाळी ८ ते रात्री ८ पोलीस तैनात असणार. ८ नंतर कुणालाही परवानगी मिळणार नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News