कोरोनावर उपचारासाठी गोमूत्र प्या … ; भाजप नेत्याचा दावा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- देशात कोरोनाने कहर केला आहे. याला अटकाव करण्यासाठी देशातील शास्त्रज्ञ आटोकाट प्रयत्न करत आहे.

यासाठी देशात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. यातच भाजपच्या एका मंत्री महोदयांनी अजबच दावा केला आहे.

भाजपाचे बुलंदशहचे आमदार देवेंद्र सिंह लोधी यांनी गोमूत्र प्यायल्याने कॅन्सर आणि करोनासारखे आजार होणार नाहीत असा दावा केला आहे.

गोमूत्र प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं ते म्हणाले आहेत. देवेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावर भाजपा नेते राजीव शुक्ला यांनी टीका केली आहे.

“हे सर्व अद्यापही सुरु आहे. कोर्टाने यांना शांत राहण्यास सांगितलं पाहिजे. अशा वक्तव्यांमुळे लोकांमधील रोष वाढतो.

कोणीही गोमूत्रच्या विरोधात नाही. पण डॉक्टर असल्याप्रमाणे करोनावरील इलाज सांगून गोमातेला यामध्ये आणू नये,” असं ते म्हणाले आहेत.

देवेंद्र सिंह लोधी यांनी रोज २५ एमएल गोमूत्र प्यायल्याने सर्व आजार पळून जातात असं म्हटलं आहे.

तसंच लिव्हर, किडनी यांनाही खराब होऊ देत नाही असं म्हटलं आहे. लोधी यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe