अवैध वाळू उपसा करणाऱ्या जेसीबीसह चालकास अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-  बेकायदेशीररित्या जेसीबीच्या सहाय्याने संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील प्रवरानदीपात्रातून वाळू उपसा करताना आढळल्याने एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळापूर येथील प्रवरानदीपात्रात गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. येथील वाळू तस्करांची मुजोरीही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे.

रोज रात्री 10 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत बैलगाड्या, पिकअप, जीप आदी वाहनांच्या सहाय्याने वाळूची वाहतूक होत आहे. दरम्यान प्रवरा नदीपात्रातून राम सोमा शिंदे (रा. कासारा दुमाला) हा जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना समजली होती.

त्यांनी तात्काळ पोलीस पथकाला पाठवून घटनास्थळाहून जेसीबी ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी राम सोमा शिंदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढता वाळू उपसा पाहता महसूल खात्याने याबाबत कडक भूमिका घेऊन वाळू तस्करांविरुध्द कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News