अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या उपचारासाठी देण्यात येणार्या रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असताना, रुग्णांच्या जीवाशी खेळणार्या
ड्रग माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली.
यावेळी कैलास सोनवणे, नईम शेख, मोईज शेख, नाजीम सय्यद, आसिफ शेख आदी उपस्थित होते. भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटल येथे पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईचे स्वागत असून, ड्रग माफियांचे मोठे रॅकेट उघडण्याची आवश्यकता आहे.
ड्रग माफिया ज्या आधार कार्डवर बोगस नावे टाकून त्यांच्या नावाचे रेमडीसीवीरचा काळाबाजार करीत आहे. कोरोना महामारीत हा दिवसाढवळ्या हा गोरख धंदा सुरु असून, हे संघटित गुन्हेगार आहे.
सदरील ड्रग माफिया सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत आहे. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची गरज आहे. सोमवारी रात्री भिंगार येथे झालेली कारवाई मध्ये भिंगार कॅम्प पोलीसांनी अन्न औषध प्रशासनाला बोलवले होते.
मात्र अन्न औषध प्रशासन मूग गिळून गप्प आहे. त्यांची देखील ड्रग माफियांबरोबर आर्थिक भागीदारी असून, अन्न औषध प्रशासन ड्रग माफियांच्या दावणीला बांधले गेले आरोप करण्यात आला आहे.
रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी अन्न औषध प्रशासनाने जाहीर केलेले मोबाईल क्रमांक बंद असून, कोणीच फोन उचलत नाही.
शहरातील मेडिकल गोडाऊनवर छापे टाकून चौकशी व्हावी, यामध्ये दोषी आढळणार्यांवर मोक्काची कारवाई व्हावी, सर्व दवाखान्यातच रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद यांनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|