दारूच्या नशेत कंटेनरची वाहनांना धडक ; अपघातात डॉक्टरचे कुटुंबीय जखमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- श्रीरामपूर येथील नेवासरोड उड्डाणपूल जवळ कंटेनर ट्रकने दोन वाहनांना धडक देऊन तिसरी धडक कारला देऊन ट्रक रस्त्याच्या खाली पलटी झाला.

दरम्यान, नगराध्यक्षा अनुराधा आदिक या हरेगावकडे जात असताना त्यांनी तात्काळ कारमधील अपघातग्रस्तांना बाहेर काढून स्वतःच्या गाडीत कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासरोड उड्डाणपूल जवळ कारला धडक दिली.

यामध्ये शहरातील डॉ. अतुल करवा यांच्या पत्नी डॉ. सपना करवा यांच्या सोबत जालना येथील डॉ. करवा यांची बहीण डॉ. दिपाली राजू मुंदडा या होत्या. अपघातामध्ये डॉ. मुदंडा (वय 45) यांना मार जास्त लागला.

दरम्यान नगराध्यक्षा अनुराधा आदिक या आपल्या वाहनाने दुपारी हरेगाव ला घरी जात असताना त्यांच्या समोर हा अपघात घडला.

आदिक यांनी तात्काळ आपली गाडी थांबवून अपघात झालेल्या डॉक्टर कारवा आणि डॉक्टर दिपाली मुंदडा याना बाहेर कडून त्याना कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

त्यांच्यावर कामगार हॉस्पिटलमध्ये डॉ. रविंद्र जगधने व त्यांचे सहकारी उपचार करत आहेत. ट्रक भरधाव वेगाने येऊन कारला धडक देऊन रस्त्याच्या खाली पलटी झाली.

ट्रक ड्रायव्हरने दारू पिले असल्याचे समजले होते. या ट्रकने टाकळीभान येथे दोन वाहनांना धडक देऊन उड्डाणपूलजवळ या कारला धडक दिली. संबंधीत ड्रायव्हरविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe