दुधाळ हे एक खमके पोलीस अधिकारी असून त्यांची पुन्हा राहुरीत नियुक्ती करावी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

दरम्यान राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपुत यांच्याकडे तात्पुरते स्वरूपात देण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा दुधाळ यांच्याच खांद्यावर राहुरी तालुक्याची संरक्षणाची जबाबदारी सोपवावी अशी मागणी होऊ लागली आहे.

तसेच त्यांची पुन्हा नव्याने राहुरी तालुक्यात बदली व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच गेल्या चार महिन्यांमध्ये कडक कारवाई केली होती.

त्यामध्ये दारू अड्ड्यांवर छापे, वाळू माफियांवर छापे टाकले. त्यांची बदली होऊ नये म्हणून सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा होत होती. सोमवारी अचानक पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची नाशिक येथे बदली झाली.

त्यामुळे राहुरी मध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यांची पुन्हा नव्याने राहुरी तालुक्यात बदली व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दुधाळ हे एक खमके पोलीस अधिकारी असून ते लवकरच तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यशस्वी ठरतील, त्यामुळे त्यांची पुन्हा राहुरीत नियुक्ती करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe