अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- गेल्या वर्षभरापासून जनता करोनाचा सामना करत आहे. करोनामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अजूनही परिस्थिती विस्कळीत आहे.
त्यातच करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. मजुरांना हाताला काम मिळेना. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.
त्यातच नेवासा तालुक्यातील नागरिकांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ ओढवली आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान नेवासा तालुक्यातील गळनिंबसह 22 गावांना जीवनदायिनी ठरलेली जीवन प्राधिकरण योजनेला ऐन उन्हाळ्यात वीज जोडणी तोडल्याचा फटका बसल्याने प्रचंड पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.
गळनिंबसह 22 गावांसाठी असलेली जीवन प्राधिकरण योजना चालू झाल्यापासूनच ‘असून अडचण नसून खोळंबा’ बनली आहे. थकित वीजबिल पाणी गळती कधी कामगारांच्या अडचणी तर कधी राजकिय आखाड्यात ही योजना अडकून पडली आहे.
काही गावांनी योजना सक्षमपणे चालत नसल्याने ठराव करून या योजनेतून अंग काढून घेतले आहे. मात्र ज्या गावांना पाण्याचा दुसरा स्त्रोत नसल्यामुळे कायमच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे .
सध्या सलाबतपूर गावात पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. विहिरी कुपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे.
नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी असलेले प्रशासन सध्या पाणीटंचाईबाबत सर्व काही माहिती असूनही कोणतीही भूमिका बजावताना दिसत नाही आहे, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|