कडक निर्बंधामुळे शहरातील प्रलंबित कामे मार्गी लागतायत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यासह शहरातील रस्त्यांवरचे गर्दी कमी झाली असून अनेक रस्त्यानावर शुकशुकाट निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील काही प्रलंबित विकास कामे मार्गी लावली जात आहे.

शहरात कडक निर्बंध असल्यामुळे कारवाईच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडत नसल्याने रस्ते ओस पडले आहे. यामुळे कामे करण्यास अडचण येत नाही. या काळात शहरातील कापड बाजार परिसरातील रस्त्यांची कामे महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली असून, या कामांना वेग आला आहे.

दरम्यान सात्यत्याने वर्दळ असल्याने शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता, बागडपट्टी आदी भागांतील रस्त्यांची कामे रखडली होती. शहरातील भुयारी गटार योजनेचे काम सुरू असल्याने रस्त्यांची कामे पूर्णपणे थांबलेली होती.

भुयारी गटार योजनेच्या कामाला वाहतुकीचा अडथळा होता. कडक लॉकडाऊनमुळे शहरातील सर्वच दुकाने बंद आहेत. नागिरकही घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील सुमारे १५ रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत.

ही कामे अंतिम टप्प्यात असून, उर्वरित रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहेत. त्यासाठीचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. सावेडी उपनगरातील तोफखाना पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल रस्त्याचेही काम रखडले होते.

हे कामही महापालिकेने हाती घेतले आहे. भुयारी गटार योजनेच्या कामाला गती देण्यात आली आहे. वाहतूक नसल्याने या कामालाही वेग आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe