‘त्या’ गुरुजींमुळेच व्यावसायिकाला मिळाले त्याचे हरवलेले सत्तर हजार रुपये!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- सध्याच्या स्पर्धेच्या व या धावपळीच्या युगात जर एखाद्याला रस्त्यावर शंभर रूपये जरी सापडले तर ते घेवून सरळ निघून जाणेच कोणीही पसंत करेल.

आणि जर ती रक्कम जर काही हजारांत असेल ते मग तर न विचार केलेलाच बरा. येथे मात्र अगदी याच्या उलट घडले आहे. ते असे रस्त्यावर पडलेले चक्क ७० हजार रूपये परत केले.

निंबळक नागापूर रस्त्यावर सापडलेले हे ७० हजार रुपये येथील प्राथमिक शिक्षक दादा घोलप यांनी खारेकर्जुने येथील हॉटेल व्यवसाईक गंगाधर लांडे यांना प्रामाणीकपणे  दिले आहेत.

याबाबत सविस्तर असे की., नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथील हॉटेल व्यवसाईकाने स्वत:चे  वाहन सत्तर हजार रुपायाला विकले. नागापूर  निंबळक परीसरामध्ये हे पैसे त्यांच्या बॅग मधून खाली पडले.

रस्ता खराब असल्यामुळे बॅग पडलेली लक्षात आली नाही. या दरम्यान रस्त्यावरुन जात असलेले ब्राम्हणी येथे नोकरीस प्राथमिक शिक्षक दादा घोलप, बंडू भोर यांना सापडले.

पैसे हरवल्याच्या लक्षात येतात लांडे यांनी या परीसरात शोध सुरू केला, माञ पैसे सापडले नाही. गंगाधर लांडे यांचीच ही बॅग असल्याचे घोलप यांना समजले त्यांनी नोटांचा तपशील विचारला असता तो बरोबर आहे. हे समजल्यावर त्याची रक्कम प्रामाणीकपणे परत दिली. लांडे यानी घोलप यांना रोख बक्षिस दिले मात्र त्यांनी नाकारले.

या प्रामाणीकपणामुळे राहुरी येथील गट शिक्षण अधिकारी, उंबरे येथील मुख्यध्यापक, विस्तार अधिकारी व शिक्षकांनी अभिनंदन केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News