कोरोनामुळे ग्रामदैवत मोहिनीराज यात्रा साध्यापद्धतीने साजरी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या नेवाशाचे ग्रामदैवत मोहिनीराज यात्रेस करोनाच्या पार्श्‍वभूमीवर साध्यापद्धतीने प्रारंभ झाला.

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व सौ.तेजल सुराणा यांच्याहस्ते मानाची पूजा करून व मानाचा झेंडा देवळावर चढवून सुरुवात झाली.

यावेळीpदेवस्थान प्रमुख महंत 1008 श्री बालब्रम्हचारी महाराज यांच्या हस्ते विधिवत ध्वजपूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली.

यात्रेचा मानाचा हा झेंडा रविवारी मोहिनीराज मंदिरावर चढविण्यात आला. यावेळी कुटे पाटील परिवाराच्या वतीने संजय एकनाथ कुटे पाटील यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले.

उपस्थित महिलांच्या वतीने ध्वजाला पंचारती ओवाळून औक्षण करण्यात आले. यावेळी नेवासा बुद्रुकचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावर्षीही करोनाचे संकट असल्याने झेंडापूजनानंतर सामाजिक अंतराचे पालन करत पाच जणांच्या उपस्थितीत मिरवणूक न काढता श्रीमोहिनीराजाच्या नावाचा जयघोष करत पायी जाऊन मंदिरावर झेंडा चढविण्यात आला.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe