कोरोनाबाधित नवरदेवामुळे अख्खं वऱ्हाड झालं क्वारंटाईन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-कोरोनामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच लग्न सराई यांना देखील नियमांच्या चौकटीत बसविले आहे. अनेकदा लग्न सराईत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरण्याचा धोका निर्माण होतो.

अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गुहागर तालुक्यातील शिरगावात चक्क नवरदेवच कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे सर्व वऱ्हाडी मंडळींना गृह विलगीकरणात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

इतकच नाही तर प्रांताच्या परवानगीचा भंग केल्या प्रकरणी आणि ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा विवाह सोहळा लांबल्या प्रकरणी ग्रामपंचायतीने नवरदेवाच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हे लग्न लावण्यासाठी आलेल्या पुरोहितालाही आता दुसऱ्या कुठल्याही कार्यक्रमाला जाण्यास मज्जाव करण्यात आलाय.

राज्यातील कोरनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं माहिती असतानाही नवरदेव थेट बोहल्यावर चढल्यामुळे गुहागर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe