घटनेच्या देणगीमुळे देशाची वाटचाल महासत्तेकडे – आमदार डॉ. सुधीर तांबे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-अत्यंत विद्वान व उच्च शिक्षित भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय राज्य घटनेमुळे सर्वांना समतेचा अधिकार मिळाला.

घटनेच्या देणगीमुळे देश महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन प्रसंगी आमदार डॉ. तांबे बोलत होते.

सिताराम राऊत, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, शिवाजी जगताप, राजू वाकचौरे, दत्ता वाकचौरे, विकास जाधव, सुमित वाघमारे, इकबाल सिंग, पी. वाय. दिघे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष चांगदेव खेमनर यावेळी उपस्थित होते.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत कुशाग्र बुद्धीचे एक उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्त्व जगाला मार्गदर्शक होते. त्यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर लिहिलेली राज्य घटना जगाला दिशादर्शक आहे.

यात सर्वांना समतेचा अधिकार दिला आहे. दलित, शोषितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या डॉ. आंबेडकरांनी शिक्षणातून प्रत्येकाच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी आयुष्य वेचले. कायदे, कामगार मंत्री अशी महत्त्वाची पदे भूषविली.

कामगारांसाठी आठ तास काम व त्यांच्या हिताचे महत्वपूर्ण कायदे केले. इतिहास, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान अशा विविध विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe