अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांवर आता ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ असे म्हणण्याची वेळ आली असल्याची टीका टीका भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
दरम्यान संगमनेर तालुक्यातील निमोण येथील पुष्पगंध सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन आमदार विखे पाटील यांच्याहस्ते पार पडले.

यावेळी बोलताना विखे पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आ. विखे पाटील म्हणाले की, या संकटाची तिसरी लाट येण्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
आताच रुग्णांना बेड मिळत नाही, इंजेक्शन जादा दराने खरेदी करण्याची वेळ आली. सरकारची कोणतीच व्यवस्था नसल्याने
सामान्य माणसाला खासगी रुग्णालयांचा आश्रय घ्यावा लागल्याने अर्थिक संकट उभे राहिले आहे. सत्ताधार्यांनी जनतेला सल्ले देण्यापेक्षा ‘प्रवरे’ प्रमाणे व्यवस्था उभी केली असती तरी कोव्हिड संकटात जनतेला दिलासा मिळाला असता, असा टोलाही विखे पाटलांनी लगावला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|