प्रसंगावधानामुळे तो बिबट्याच्या कचाट्यातून निसटला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- गेल्या अनेक महिन्यांपासून नगर जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तसेच या भक्षक बिबट्याने प्राण्यांवर देखील हल्ले करत त्यांना ठार केले आहे.

नुकतेच राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील शेतकरी अविनाश सुरेश तुंबारे यांचा बारा वर्षाचा मुलगा साईनाथ बिबट्याच्या तावडीतून बालंबाल बचावला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, घराजवळ असलेल्या गवतावर शेळ्या चरत होत्या.

त्यांना हुसकावून लावण्यासाठी साईनाथ शेळ्यांकडे गेला. शेजारीच असलेल्या उसात बिबट्या दबा धरुन बसलेला होता. बिबट्याने एका बोकडावर हल्ला करून त्याला ठार मारले होते तर दुसर्‍या शेळीची मान धरून उसात ओढण्याचा प्रयत्न करत असताना साईनाथ या ठिकाणी पोहोचला.

समोरचे विदारक दृश्य बघून त्याने प्रसंगावधान दाखवत आरडाओरड न करता घराकडे पळाला. घराच्या घडलेला प्रकार सांगितलं. घरच्यांनाही ताबडतोब शेताकडे धाव घेतली. त्यांनी तिथे राहिलेल्या दोन तीन शेळ्या घेऊन सगळी मंडळी घरी आली. त्यांनतर वनविभागाला या घटनेची माहिती दिली असता वन विभागाचे सर्व अधिकारी घटनास्थळी हजर झाले.

सदर घटनेचा पंचनामा केला. या ठिकाणी चार-पाच बिबट्यांची टोळी असल्याचे बोलले जाते त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सुरेश तुंबारे यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe