कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने जिल्ह्यातील ‘ह्या’ ठिकाणी कन्टेंनमेंट झोन

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- शेवगाव तालुक्यात कोगेनाचे २८३ रुग्ण उपचार घेत असुन सर्वात जास्त रुग्ण संख्या वाढल्याने प्रभुवडगाव कन्टेंनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.

महिनाभरापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण कमी होत असताना अनलॉकमुळे वाढती गर्दी पाहता आता रुग्ण संख्या काही प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सध्या तालुक्यात ५७ गावांतून २८३ कोरोना बाधित रुग्ण आहेत. पैकी ८५ रुग्ण कोविड सेंटर मध्ये दाखल आहेत तर २५ रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

यातील २१ रुग्ण ऑक्सिजनवर व एक रुग्ण व्हेटिंलिटरवर आहे. या महिन्यात ३८ ग्रामपंचायतील ५१ गावे सध्यातरी कोरोनामुक्त आहेत.

प्रभुवडगाव येथे १३ जुलै रोजी एकाच दिवशी २१ बाधित रुग्ण आढळल्याने ते गाव कन्टेंनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.

तेथे आजपर्यंत ३८० रॅपिड, तर १९८ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यात ६४ बाधित रुग्ण आढळून आले. तालुक्यात दुसऱ्या लाटेत १० हजार ८८६ बाधित रुग्ण झाले.

त्यातील १० हजार ५३१ रुग्ण बरे झाले व १६१ रुग्णांचा मृत्यु झाल्याची नोंद प्रशासन दरबारी आहे. प्रत्यक्षात मात्र मृत्युचा आकडा जास्त असावा असा अंदाज काढला जात आहे. कोरोनाचा धोका कायम असताना गर्दीचा मात्र उच्चांक पाहावयास मिळत आहे.