रूग्णवाढीमुळे नगर तालुक्यातील या ठिकाणी सुरु होणार कोविड केअर सेंटर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात मागील दोन महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसून येत आहे.

नगर तालुक्यात करोना रूग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने तालुक्यातही कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी होत आहे.

त्यानुसार जेऊर येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत शुक्रवारी तहसीलदार उमेश पाटील यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यक्ष पाहणी करून चर्चा केली.

येथे लवकरच कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या 14 गावांमध्ये आजपर्यंत 500 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

कोविड सेंटर सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार उमेश पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत डॉ. योगेश कर्डिले यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

तहसीलदार पाटील यांनी ग्रामपंचायतीकडून सहकार्य मिळाल्यास जेऊर येथे तत्काळ कोविड सेंटर सुरू करण्यात येईल,

असे सांगितले. कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जेऊर येथील एक विद्यालय ताब्यात घेण्यात येणार आहे..

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe