पोलिस ठाण्यात तरुणीच्या ‘या’ भूमिकेमुळे पोलिसही चक्रावले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- बिहार राज्यातील हाजीपूर महिला पोलीस स्टेशनमध्ये तरुणीने तिच्या पोलीस कॉन्स्टेबल प्रियकरावर एक वर्षापासून लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप लावला. तिचा प्रियकर हा हाजीपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहे. पीडित तरूणीने लावलेले गंभीर आरोप पाहता एसएचओंनी लगेच आरोपीला बोलवलं.

पोलीस आरोपी विरोधात एफआयआर दाखल करण्यास तयार झाले. मात्र, पीडीत तरूणीने असं करण्यास नकार दिला आणि पोलीस स्टेशनमध्येच लग्न लावून देण्याची मागणी केली. तरुणीच्या या भूमिकेमुळे पोलिसही चक्रावून गेले. ही तरूणी फेसबुकवर एका तरूणाला भेटली आणि दोघांमध्ये प्रेम झालं.

पटण्याला राहणाऱ्या अल्पवयीन तरूणीने आरोप लावला आहे की, हाजीपूर पोलीस लाइनमध्ये तैनात कॉन्स्टेबलसोबत फेसबुकवर मैत्री झाली. आरोपी पोलिसाने पोलीस लाइनजवळ भाड्याने एक घर घेतलं होतं. तिथे दोघेही पती-पत्नीसारखे एकत्र राहत होते.

पण नंतर तरूणाने लग्न करण्यास नकार दिला. तरूणी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. तरूणीच्या या हायहोल्टेज ड्राम्यामुळे पोलीस स्टेशन बाहेरही मोठी गर्दी जमा झाली होती. तरूणीचा हा ड्रामा दिवसभर सुरू होता.अखेर एसएचओंनी तरूणीच्या कुटुंबियांची माहिती काढली आणि त्यांना नातेवाईकांसोबत पोलीस स्टेशन येण्यास सांगितले.

नंतर पोलिसांनी तरूणीला कुटुबियांकडे सोपवलं. आणि तर आऱोपीकडून पत्र घेऊन त्याला पोलीस लाइनला सोडलं.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe