अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान हि कामगिरी कर्जत पोलिसांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत पोलिसांना गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की पाटेगाव आणि पाटेवाडी शिवारात काही इसम संशयास्पदरित्या असून ते नगर-सोलापूर महामार्गावर 4 ते 5 इसम रस्त्यावर येवून गाडी अडवित आहेत.
त्यानंतर पोलीस पथक तात्काळ घटनस्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच चोरटे तिथून पळून जाऊ लागले. पोलिसांनी स्थानिक नागरीक यांचे मदतीने पाठलाग करून शाहूराज बाबासाहेब कोकरे (वय 21, रा. घाट पिंपरी, ता. आष्टी),
योगेश गोयेकर, (वय अंदाजे 27, रा. गोयेकरवाडी, ता. कर्जत), आकाश कोपनर, (रा. काळेवाडी-राशीन, ता. कर्जत), शहाजी शिरगिरे (वय 24, रा. जामवाडी, ता. जामखेड), बाळू, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही यांना पकडले असून
त्यांच्याकडे एक सुरा, मोबाईल आणि चोरीची पल्सर कंपनीची दुचाकी (एम.एच. 12 आर.ई. 1474) मोटारसायकल जप्त केली आहे.
यामध्ये फरार योगेश गोयेकर याच्यावर दरोड्याचा जबरी चोरीचे, चोरीचा असे 4 गुन्हे पूर्वीच दाखल आहेत. तर अटक आरोपी दौड येथील गुन्ह्यात फरार होता.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|